सहकार नगर नागरी मंच
सहकार नगर नागरिक मंच सभा दिनांक 30 डिसेंबर 2023
सभेला उपस्थित सभासद खालील प्रमाणे
1. Vivek Bapat,2. A. V. Unde,3. Sameer kelkar,4. Ketaki Sathe-Kulkarni,5. Amit Abhyankar,6. Purushottam Durwas,7. Indraneel Sadalge,8. Kiran Gulumbe,9. Shaila Navlakha,10. Niharika Patankar ,11. Pranav Unde,12. Sameer Abhyankar,13. Bapu Patil 14. Kirti Puranik,15. Vaidya Datta , 16.Rao Sudhir
सभेचा इतिवृत्तान्त
1. सुरुवातीला इंद्रनील यांनी काल झालेल्या मोहल्ला कमिटीच्या मधील चर्चेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की आपल्या फोरमच्या पाठबळाच्या जोरावरती अनेक नागरिक आता निर्भीडपणे प्रशासनाला प्रश्न विचारत आहेत आणि प्रशासन योग्य ती कारवाई ही करत आहे. त्यामुळे आपण नागरिकांना सामाजिक प्रश्न धसास लावण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे.तसेच आपण कॅमेरा प्रमाणेच कचरा ,स्वच्छता, रस्ते या विषयांसाठी वेगवेगळे समूह तयार करायला पाहिजेत.
अशा समूहांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या भागातील नागरिकांना आवाहन करण्याचे ठरले.
श्री गुळुंबे यांनी सांगितले की महानगरपालिकेने सार्वजनिक बागांमध्ये जे कार्यक्रम होतात त्याला सर्वकष बंदी घातली पाहिजे. इंद्रनील यांनी सांगितले की अशा प्रकारची मागणी आपण करू शकत नाही. मात्र आपण अशा कार्यक्रमामुळे होणारी बागेची , लॉनची खराबी, स्पीकर चे आवाज आणि फटाके यावर बंदी घालण्यासाठी अर्ज करू शकतो.
2.समीर केळकर यांनी कॅमेरा विषयी माहिती दिली, ६४ पैकी एकंदर फक्त १९ कॅमेरे चालू असल्यामुळे त्यांनी पुणे महानगरपालिकेत विद्युत अभियंता तसेच पोलीस चौकीतील कर्मचारी श्री निकाळजे यांच्या भेटी घेऊन अडचणी समजावून घेतल्या. महानगरपालिकेतर्फे आश्वासन देण्यात आले आहे की आठ दिवसात ते सर्व कॅमेरे चालू करतील. त्यांच्या मते वायर तुटण्याची अनेक कारणे आहेत; परंतु बरेचसे कॅमेरे २३ ऑक्टोबर पासून म्हणजे जवळपास दोन महिने बंद आहेत. त्यामुळे यापुढे समीर केळकर व त्यांचे सहकारी वेळोवेळी पोलीस चौकीला भेट देऊन कॅमेरे चालू आहेत का नाही हे तपासतील.समीर केळकर आणि त्यांचे सहकारी सर्व कॅमेऱ्याच्या जागा तपासणार आहेत आणि त्या गुगल लोकेशन वरती मार्क करायचे काम केतकी साठे करणार आहेत.
समीर यांनी सांगितले की पूर्व सूचना देऊन आणि त्यांनी दिलेल्या वेळेवर पोहोचून सुद्धा विद्युत अभियंता पवार हे ४५ मिनिटं उशिरा आले. ते कुठे गेले होते याची कोणालाच नीट माहिती नव्हती त्यामुळे या संदर्भात आपण काहीतरी हालचाल करावी असे त्यांनी सुचवले. महानगरपालिकेत अधिकाऱ्याने बाहेर जाताना वहीमध्ये त्याची नोंद करायची असते.
ही पद्धत पाळली जात नाही तरी ती सुरू करणे गरजेचे आहे.
इंद्रनील यांनी सांगितले, की महानगरपालिकेमध्ये प्रत्येक सोमवारी दुपारी तीन ते पाच ही अधिकाऱ्यांनी नागरिकांना भेटण्यासाठी वेळ ठेवलेली आहे. त्यावेळी आपण आपल्याला पाहिजे ती माहिती घेऊ शकतो; आपल्याला प्रतिही मिळू शकतात. इंद्रनील यांनी सुचवले की आपण या माहितीचा फलक दर्शनी भागात नागरिकांना दिसेल अशा प्रकारे लावण्यास महानगरपालिकेला सांगावे.
यानुसार सहकार नगर नागरी मंचातर्फे असे पत्र महानगरपालिकेला देण्याचे ठरले.
इंद्रनील यांनी सांगितले की कुठलाही शासकीय अधिकारी आपल्याला RTI व्दारे मागवलेली माहिती कशासाठी हवी आहे हे विचारू शकत नाही.
3.श्री अमित अभ्यंकर यांनी सांगितले की त्यांचे श्री कडू ज्युनिअर इंजिनिअर रस्ते खाते यांच्याशी बोलणे झालेले आहे आणि रस्त्या संदर्भातल्या सर्व सूचना त्यांनी मान्य केल्या आहेत. पाईप गॅसच्या कामामुळे जे पेव्हर खराब झालेले आहेत अथवा वर खाली झाले आहेत ते दुरुस्तीचे काम DLP ( development liability period) या नियमानुसार MNGLकडूनच करून घेतले जाईल असे कडू यांनी सांगितले आहे.तसेच श्री कडू आपल्या पुढच्या सभेला स्वतः हजर राहणार आहेत असे समीर यांनी सांगितले.
4.श्री दुर्वास यांनी सांगितले की हॉलच्या संदर्भात श्री ढाकणे, बर्वे आणि दांगट यांच्याशी भेटीगाठी चालू आहेत. पत्रावरती सही झालेली आहे आणि लवकरच आपल्याला हॉलचा ताबा मिळेल. तसेच त्यांनी असे सुचवले की, नागरिकांसाठी उपलब्ध केलेल्या सर्व जागा यावर महानगरपालिकेची मालकी आहे असा फलक लावणे गरजेचे आहे.
यानुसार सहकार नगर नागरी मंचातर्फे असे पत्र महानगरपालिकेला देण्याचे ठरले.
5. प्रणव उंडे यांनी आपल्या येथील बस सेवे संदर्भात माहिती मिळाली गोळा केली होती त्या संदर्भात चर्चा झाली आणि काही बसेसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी ते आता प्रशासनाला विनंती करणार आहेत .मुंडे यांनी आपल्या येथील सर्व बस मार्गासाठी EPK ( earning / km )काय आहे याची माहिती दिली. महानगरपालिकेच्याप्रमाण एपीके २० असेल तर बस चालू ठेवायला काहीही अडचण नसते
6.केतकी साठे या, पाचगाव पर्वती येथील वनखात्याची हद्द कुठली आणि महानगरपालिकेची हद्द कुठली याचे डीमार्केशन याची माहिती असावी आणि तसा फलक तिथे असावा यासाठी महानगरपालिकेत पाठपुरावा करत आहेत. सध्या वाघजाई येथून अनेक लोक पायी आणि वाहनावरून ये जा करतात .त्यांची वाहने रात्री आपल्या रस्त्यावरती लावतात आणि त्यामुळे खूप अडचणी येत आहेत .यासाठी ही हद्द निश्चिती करणे गरजेचे आहे असे सर्वांचे मत पडले . त्यावर उपाय काय करावे याचीही चर्चा झाली.
7. अमित अभ्यंकर यांनी सांगितले की विवेक बापट यांनी आपल्याला देण्यात येणाऱ्या हॉल चालवण्यासंदर्भात नियमावली केली आहे. ती नियमावली इंद्रनील यांनी वाचून दाखवली.
श्री वैद्य यांनी सांगितले, ते हॉल साठी संगणक देतील . राव यांनी सांगितले की हॉल संदर्भात जमा खर्च लिहिणे, ताळेबंद करणे ही कामे ते करू शकतील तसेच गरज पडल्यास त्यांच्या जवळील प्रोजेक्टर ते आपल्याला वापरायला देऊ शकतात. श्री उंडे यांनीही मंचाच्या आर्थिक कामकाजात मदत करायची तयारी दाखवली.
समीर अभ्यंकर यांनी सांगितले की हॉल ताब्यात आल्यानंतर, हॉल साठी लागणारे साहित्य देणगी स्वरूपात मिळण्यासाठी आपण विविध माध्यमातून आपल्या भागातील नागरिकांना आवाहन करू.
इंद्रनील यांनी सर्वांचे आभार मानले आणि सभा संपली
विवेक बापट
CCTV Audit details 23rd Dec.23
सीसीटीव्ही कॅमेरेच्या ऑडिट साठी आपल्याकडे खाली दिल्याप्रमाणे नोंद ठेवणे. संगणक उपलब्ध असेल तर ह्या नोंदी आपण संगणकावरती स्टोअर करू शकतो.This can be done using xl sheet.
१. व्हिडिओ रेकॉर्डरची जागा व त्याला लावलेल्या सर्व कॅमेराच्या जागांची माहिती.
२. सिस्टीमला बॅकअप आहे का नाही. असल्यास बॅकअप किती तासाचा आहे आणि बॅटरीची देखभाल करण्यासाठी काही व्यवस्था आहे का ?
३. हार्ड डिस्क किती कॅपॅसिटी ची आहे. रेकॉर्डिंग किती दिवसाचे होते.
४. सिस्टीम कुठल्या कंपनीची आहे व सिस्टीमची देखभाल आणि कॅमेरे साफ करण्यासाठी कोणाला नेमले आहे का ; आणि कोणाला नेमल्यास असल्यास त्या कामाच्या अटी आणि शर्ती काय आहेत ? या अटींमध्ये काही ठराविक दिवसांनी, “सर्व सिस्टीमची तपासणी करणे अशी अट आहे का ते बघणे. ( अशी व्यवस्था असेल तर आपल्याला फार वेळा जावे लागणार नाही . अर्थात मधून मधून हे करावेच लागेल . Surprise visit )
५. कॅमेरा सिस्टीम चे मॉनिटरिंग २४ तास होते का ; का काही तक्रार आल्यास त्यावेळी रेकॉर्डिंग बघितले जाते.
६. नागरिकांना व्हिडिओ रेकॉर्डिंग बघता येते का आणि रेकॉर्डिंग कॉपी करून हवे असल्यास ते देता येते का ?
७. एखादा कॅमेरा बंद पडल्यास तो लगेच बदलला जातो का ? किंवा दुरुस्तीसाठी काही कालावधीची मर्यादा दिली आहे का ? चौकीतर्फे देखभाल करणाऱ्या व्यक्तीला बोलवले जाते का मुख्य कार्यालयाला कळवून मग मुख्य कार्यालय दुरुस्तीची कार्यवाही करते.
8.कॅमेरा सिस्टीम दररोज बघण्यासंदर्भात चौकी मध्ये काही लेखी सूचना आहेत का ? त्याची माहिती घेणे.माझ्या माहितीप्रमाणे चौकीमध्ये, “दररोज कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग व्यवस्थित चालू आहे ना”, हे बघायच्या सूचना असतात , आणि शिवाय त्याची नोंद ही ठेवली जाते.
आपले स्वयंसेवक ज्या ज्यावेळी चौकीमध्ये कॅमेरे तपासायला जातील त्यावेळी त्याचे रेकॉर्डिंग व्यवस्थित चालू आहे ना , किती दिवसाचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे आणि बॅकअप व्यवस्थित आहे ना याची माहिती घ्यावी. या भेटीच्या वेळी सर्व कॅमेऱ्यांचे रात्रीचे रेकॉर्डिंग ( रात्री १२ नंतर ) बघावे. एखादवेळी असे होते की कॅमेऱ्याचा नाईट व्हिजन बंद होतो त्यामुळे दिवसा रिकॉर्डिंग चांगले होते परंतु रात्री अंधार पडला की रेकॉर्डिंग होत नाही. तसेच शक्यतो दर पंधरा दिवसांनी हे काम करणे गरजेचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी साधारण एक दीड तास लागू शकतो.
चौकीला भेट देऊन ही माहिती घेण्यासाठी आपल्याला काही पूर्व परवानगीची आवश्यकता आहे का याची माहिती घ्यावी लागेल. कदाचित एखादेवेळी अडथळा येणार नाही, परंतु आपण जर ठराविक दिवसांनी हे काम करायला लागलो तर कदाचित परवानगी लागू शकेल.
सहकार नगर नागरी मंच डुमे हॉल चालवण्यासाठी लागणारे साहित्य , मनुष्यबळ आणि त्या संदर्भात नियमावली.
१. हॉलमध्ये२५ खुर्च्या , २ टेबल, ऍम्प्लिफायर , कॅमेरा सिस्टीम, दोन मोठ्या सतरंज्या, भिंतीवरचे घड्याळ, कॅलेंडर, २३० v एक्सटेन्शन बोर्ड, कॅमेरा सिस्टीम, यु पी एस, राऊटर , एक मोठे कपाट, केराचा ड्रम,स्टूल , छोटी शीडी , हॉल वापरणाऱ्यांसाठी नियमावलीची पाटी हे सामान लागेल.
२. कार्यालय खोलीमध्ये एक टेबल, चार खुर्च्या, घड्याळ ,स्टेशनरी( फाइल्स ,पेन , पेन्सिल , पंचिंग मशीन , स्टेपलर, टाचण्या , युक्लीप, रबर बँड, खोडरबर, टोक यंत्र, छोटा चाकू , पेपरवेट ई ) , हॉल वापरण्यासंदर्भातील अर्जाचे फॉर्म, पावती पुस्तक ,एक कपाट, QR कोड , इंवर्ड /आवक रजिस्टर, आउट वर्ड / जावक रजिस्टर ,डेड स्टॉक रजिस्टर,प्लॅनिंग चे कॅलेंडर , छोटी तिजोरी, तांब्या भांडे, केराची टोपली , स्टूल ,फोन आणि मोबाईल या गोष्टी लागतील.
शक्य झाल्यास संगणक. ई-मेल अकाउंट असणे गरजेचे आहे . तसेच मंचाच्या कामकाजा संदर्भात फेसबुक, ब्लॉग आणि व्हाट्सअप वर बारीक तपशीला सहित सर्व माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून लोकांना लिंक पाठवली की ते त्यावरून माहिती वाचू शकतील.
३. सामान ठेवायची खोलीमध्ये सामान ठेवण्यासाठी लोखंडी रॅक लागतील.
कामकाज चालू करण्याआधीची पूर्वतयारी
हॉल आणि दोन्ही खोल्यांच्या बाहेर मराठीतून पाटी. त्यावरती मंचचे नाव, पत्ता, वेळ , कार्यालयीन सुट्टीचा दिवस आणि फोन नंबर.
सर्व फर्निचर वरती नाव आणि क्रमांक लिहिणे गरजेचे आहे ( or QR code stickers ) . ज्यावेळी आपल्याकडे संगणक उपलब्ध होईल त्यावेळी सर्व रजिस्टर संगणकावरती ठेवली जातील. मंचाचा सर्व हिशोब हा संगणकावरती ठेवला जाईल गरज पडल्यास टॅली सॉफ्टवेअर घेता येईल. मंचाच्या सर्व बैठकांची आणि कामकाजाची मिनिट्स लिहिली जातील. या सर्व गोष्टींच्या सॉफ्ट कॉपी या क्लाऊड वरती साठवून ठेवणे गरजेचे आहे.
तिन्ही जागांच्या किल्ल्यांचे तीन संच असतील. एक अधीक्षकांजवळ एक अध्यक्ष आणि एक सचिव यांच्या जवळ. मंचाच्या ऑफिसला वर्षात सुट्ट्या किती द्यायच्या ते ठरवावे लागेल आणि ज्यावेळी अधीक्षक अथवा शिपाई उपलब्ध नसेल त्यावेळी पर्यायी व्यवस्था करावी लागेल.कार्यालयीन सुट्टीचा दिवस ठरवणे.
कॅमेराचे रिमोट मॉनिटरिंग करण्यासाठी दोन व्यक्तींना जबाबदारी द्यावी. गरज भासल्यास व्हिडिओ डाऊनलोड करून ते क्लाऊड वरती साठवावेत.
बँकेकडून QR कोड घेणे . तसेच मंचाच्या कामकाजा संदर्भात फेसबुक, ब्लॉग वर बारीक तपशीला सहित सर्व माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून लोकांना लिंक पाठवली की ते त्यावरून माहिती वाचू शकतील.
अभ्यासताना अथवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी चहा अथवा नाश्ता मागवण्यासाठीची नियमावली करावी लागेल.
हॉल मध्ये पुरेसे दिवे आहेत का ते तपासणे . सब मीटर लावून घेणे.
कुठले कार्यक्रम करता येतील हे ठरवावे लागेल .खाली माहिती दिली आहे ती चर्चा करून अंतिम करावी लागेल.
सामाजिक , शैक्षणिक ,सांस्कृतिक , क्रीडा विषयक कार्यक्रम हॉल मध्ये करता येतील . घरगुती , धार्मिक अथवा राजकीय कार्यक्रम करायला परवानगी नाही.
सध्या काही संस्था नियमित पणे हॉल वापरत आहेत आणि त्यांचे सामानही हॉलमध्ये ठेवलेले आहे . त्या संस्थांना परवानगी कुणी दिली आहे ? लेखी परवानगी आहे का ? काही करार झाला आहे का ? त्या हॉल वापरण्यासाठी काही भाडे देतात का ? या संस्था कार्यक्रमास येणाऱ्या लोकांकडून काही फी घेतात का ? कार्यक्रमाच्या वेळा काय असतात ? काय स्वरूपाचे उपक्रम राबवले जातात ? या सर्व गोष्टींची माहिती घेणे. ही माहिती आल्यावर ती आपल्याला त्याविषयी निर्णय घेता येईल.
हॉल वापरणाऱ्यांना खायचे पदार्थ आणण्याची परवानगी द्यायची का हे ठरवावे लागेल. ही परवानगी जर दिली तर कचरा व्यवस्थापन हा मोठा प्रश्न होऊ शकतो.
विज बिल, काम करणाऱ्या लोकांचे मानधन व इतर छोटे मोठे खर्च ( fixed expenses, थोडक्यात फक्त वास्तु सांभाळण्यासाठी येणारा खर्च ) याचे अंदाजपत्रक करणे गरजेचे आहे. म्हणजे पैसे उभे कसे करायचे याचा विचार करता येईल. समूहावर आवाहन करून व्यवस्थापक आणि लेखापाल या कामासाठी विना मानधन कोणाची काम करायची तयारी आहे का याचा शोध घ्यावा असे मला वाटते. शिपाई विना मानधन मिळेल असे मला वाटत नाही.
कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांना वाहने हॉल परिसरात लावायची काही सोय आहे का ? ही माहिती घ्यावी लागेल. तशी काही सोय असली तर ती जागा आणि सोय नसली तर वाहने रस्त्यावरती लावावीत ही माहिती माहितीपत्रकात समाविष्ट करणे गरजेचे आहे. पार्किंग साठी जागा ठेवली असल्यास तिथे पाटी लावावी.
जसे आपण क्राउड फंडिंग माध्यमातून पैसे उभे केले, तसेच आपल्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याची यादी आपण सहकार नगरच्या वेगवेगळ्या समूहावर टाकली तर अशा वस्तू देणारे दाते आपल्याला भेटतील. बरेच वेळा आपल्याकडे अनेक वस्तू विना वापर पडलेल्या असतात त्याचाही सदुपयोग होईल.
कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली.
आपल्याला कामकाजासाठी एकंदर व्यक्ती ती लागतील व्यवस्थापक, शिपाई आणि लेखापाल
१. व्यवस्थापकाची कामे
ऑफिस व्यवस्थापक येणाऱ्या सर्व अध्यागतांची नावे , फोन नंबर आणि कामाचे स्वरूप याची नोंद व्हीझीटर रजिस्टर मध्ये करेल. अधीक्षक येणाऱ्या सर्व दूरध्वनीची सुद्धा विजिटर वहीमध्ये नोंद करेल . तसेच येणाऱ्या सर्व कागदपत्रांची नोंद इन्व्हर्ट रजिस्टर मध्ये आणि आपण पाठवलेल्या पत्रांची नोंद आउटवर्ड रजिस्टर मध्ये करेल आणि योग्य फाईल मध्ये ठेवून देईल. चेक आणणे, आलेले चेक बँकेत भरणे, पत्र पोस्ट करणे,रोख रकमेचा हिशोब ठेवणे.दररोज पाच मिनिटे अधीक्षक कॅमेरा सिस्टीम चालू आहे का नाही हे बघेल.
आपल्याजवळ असलेल्या सर्व वस्तूंची नोंद डेड स्टॉक रजिस्टर मध्ये करेल आणि साधारण महिन्यातून एकदा हा स्टॉक तपासला जाईल आणि तपासणारा डेड स्टॉक रजिस्टर मध्ये सही करून तशी नोंद करेल.
ऑफिस व्यवस्थापक दररोज आल्यावरती ई-मेल आणि व्हाट्सअप बघेल आणि गरजेप्रमाणे आवश्यक माहिती इमेलवर अथवा व्हाट्सअप वरती संबंधित लोकांना पाठवेल. येणाऱ्या सर्व अध्यागतांर्ना हॉलमध्ये घेता येणाऱ्या कार्यक्रमा संदर्भात व्यवस्थित माहिती देईल. ज्यांना कार्यक्रमासाठी जागा हवी आहे त्यांच्याकडून फॉर्म भरून त्यांना कार्यक्रम ठरल्याची रित सर पावती देईल .लागोपाठ कार्यक्रम असतील तर दोन्ही कार्यक्रमाच्या मध्ये कमीत कमी एक तास वेळ द्यावा. कोणी ऐच्छिक देणगी दिली तर त्यांना देणगीची पावती देईल. ऑफिस मधील काही गोष्टी संपल्या तर लगेचच वरिष्ठांच्या कानावर घालून त्या वस्तू आणायची व्यवस्था करेल.जरुरीप्रमाणे या सर्व कामांसाठी तो शिपायाची मदत घेईल.
दर महिन्याला विज , फोन व मोबाईल चे बिल भरणे . महानगरपालिकेचे भाडे भरणे.
साकोरी बाहेर कार्यक्रमासाठी कोणी मागणी केली अथवा दबाव आणला तर त्याची माहिती त्वरित वरिष्ठांना कळविण्यात येईल.
२.शिपायाची कामे
तिन्ही जागेची साफसफाई करणे , समारंभाच्या वेळी खुर्च्या ,एंपलीफायर वगैरेची मांडणी करणे आणि नंतर सर्व गोष्टी जागेवरती ठेवणे.शिपायाच्या वेळा या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या असतील , कारण काही वेळा कार्यक्रम संध्याकाळी अथवा उशिरा असेल तर त्यानंतर हॉल बंद करणे व सामान जागेवर ठेवणे ही कामे करावी लागतील. एखादा कार्यक्रम जर सुट्टीच्या दिवशी असेल तर त्या दिवशी शिपायाला हजर राहावे लागेल आणि ती सुट्टी त्याला आठवड्यातल्या दुसऱ्या कुठल्यातरी दिवशी घेता येईल. बँकेचे स्टेटमेंट आणणे, केर टाकणे, पाणी भरणे.
3.लेखपाल कामे
सर्व हिशोब लिहिणे . बँकेचे स्टेटमेंट तपासणे.संगणक आल्यावरती ही कामे संगणकावर करणे, बँकेचे स्टेटमेंट डाऊनलोड करणे.
हॉल वापरणाऱ्यांसाठी नियमावली
१. ठरलेल्या वेळाच्या आधी पंधरा मिनिटे पावती घेऊन येणे व हॉलचा ताबा घेणे.
२. एंपलीफायर चा आवाज आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल असा ठेवू नये.
३. जमलेला सर्व कचरा जाताना कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकणे .
४. नियोजित वेळेच्या पुढे दहा मिनिटापेक्षा जास्त कार्यक्रम सुरू ठेवू नये.
५.भिंतीवर रंग खराब होईल अशी सजावट करू नये. सजावट भिंतीवर लावण्यासाठी हुक लावलेले आहेत त्याचा वापर करावा.
६.पाण्याची व्यवस्था स्वतः करावी. शक्यतो प्लास्टिक ,थर्मोकोल याचा वापर कमी करावा . पर्यावरण पूरक वस्तू वापराव्यात.
७.नेमलेल्या जागी वाहने नीट लावावीत. येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होईल अशा प्रकारे वाहने लावू नयेत.
८.कार्यक्रमाच्या वेळी हॉलच्या परिसरात अथवा रस्त्यावर फटाके उडवायला परवानगी नाही.
विवेक बापट: कर्णपिशाच्च ( फोन ) ९३७१०१००१७.२४२२१४८६.
E mail :vitronicspune@gmail.com